जेएनपीटीतील पाच बंदरांनंतर 300 मीटर जेट्टीही धनदांडग्यांच्या घशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ओळख काम पूर्ण असलेल्या जेएनपीटीतील पाच होण्या अगोदरच बंदरांनंतर आता येथील तीनशे मीटर लांब जेट्टीही धनदांडग्यांच्या घशात घालण्यात येणार आहे. 314 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या | खासगीकरणासाठी निविदा मागवल्या या अॅडिशनल लिक्विड बल्क जेट्टीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायद्याची ठरणाऱ्या या जेट्टीचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही खासगीकरणाची घिसाडघाई लावल्याने नेमके कोणाचे ‘चांगभलं’ करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा सवाल भूमिपुत्रांनी विचारला आहे.

जेएनपीएच्या मालकीच्या असलेल्या 300 मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी – 02 व एसबी- 03 या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बर्थवरून वर्षाकाठी 6.5 दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणावर तरल पदार्थांची हाताळणी केली जाते. मात्र वाढत्या तरल पदार्थांच्या हाताळणीसाठी सध्याचे लिक्विड बल्क टर्मिनल अपुरे पडत आहेत. जहाजांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे आयात व्यापाऱ्यांना नाहक अतिरिक्त वेळ, पैसा खर्च करावा लागत असल्याने जेएनपीए बंदर प्राधिकरणाने अतिरिक्त लिक्विड कार्गो हाताळणी सुविधा विकसित करण्यात येत आहे.

युद्धपातळीवर काम

जेट्टीच्या दोन्ही बाजूला 25000 ते 70000 डीडब्ल्यूटी (डेडवेट टनेज) क्षमतेपर्यंतची जहाजे एकाच वेळी हाताळण्याची सुविधा या जेट्टीला लागून असलेल्या दुहेरी बर्थमध्ये आहे. अतिरिक्त लिक्विड बर्थचा विकास सध्याच्या लिक्विड कार्गो हाताळणी ऑपरेशन्सच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 300 मीटर लांब असलेल्या या जेट्टीचे | काम युद्धपातळीवर सुरू असून मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र पाच बंदरांच्या खासगीकरणानंतर ही जेट्टीदेखील 30 वर्षांसाठी पीपीपी तत्त्वावर चालविण्यात देण्यात येणार आहे.