Video : डोंगर चढताना पाय घसरला, जेएनयूच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दिल्लीतील जवाहार लाल नेहरू विद्यापीठात शिकत असणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्याचा ट्रेकिंग करत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. प्रवीण तिवारी असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अभ्यासात हुशार असल्याचे सांगण्यात येते. ट्रेकिंगला जाताना  कोणत्याही सुरक्षेशिवाय तो गेला होता.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रवीण हा मूळचा जबलपूरचा रहिवासी. शिक्षणासाठी दिल्लीला आलेला प्रवीण हा जेएनयू विद्यापीठात आयसीएसएसआरचे शिक्षण घेत होता. 30 डिसेंबरला प्रवीण त्याच्या मित्रांसोबत त्याच्या हॉस्टेलच्या जवळ असलेल्या जंगलात गेला. त्यावेळी डोंगर चढण्याचा तो प्रयत्न करत होता व त्याचा मित्र व्हिडीओ रेकॉर्ज करत होता. डोंगराचा कडा चढत असताना ज्या खोबनीत त्याने हात ठेवला होता तो भाग तुटला व तो खाली कोसळला. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला त्याच्या मित्रांनी तत्काळ रुग्णालयात नेले मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.