संतापजनक! ‘जेएनयू’मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड

‘तुकडे तुकडे’ गँगच्या घोषणाबाजीमुळे आधीच बदनाम झालेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘जेएनयू’मध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर याठिकाणी अश्लाघ्य भाषेतीत एक टिप्पणी लिहिल्याचे निदर्शनास आले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी जेएनयूमधील हा प्रकार समोर आला. देशभरात बालदिन उत्साहात साजरा होत असताना ‘जेएनयू’मध्ये मात्र स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार नक्की कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस या घटनेमागील व्यक्तीचा शोध घेत आहेत.

फीवाढीविरोधात आंदोलन
‘जेएनयू’मध्ये गेल्या काही दिवसांपासून फीवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. तसेच दीक्षांत सोहळा अन्यत्र हलवल्याने नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी आमनेसामने आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर फीवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला असला तरी गुरुवारीही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. याच दरम्यान कोणीतरी हे कृत्य केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या