शुभवार्ता – कोरोनाच्या फटक्यातून पर्यटन क्षेत्र सावरलं, नोकऱ्या 4 टक्क्यांनी वाढल्या: रिपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसाला, असंख्य नोकऱ्या गेल्या, उद्योग बुडाले. जगभरात सर्वाधिक फटका कोणत्या क्षेत्राला बसला असेल तर ते ‘प्रवास आणि पर्यटन उद्योग’ आहे. गेल्या दोन वर्षांपासून जवळपास ठप्प असलेल्या या क्षेत्राला पुन्हा गती मिळू लागली असून नव्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. आता हे क्षेत्र पुन्हा हळूहळू सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबरमध्ये या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वार्षिक चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवास आणि पर्यटन उद्योगात नवीन नोकऱ्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.

रिपोर्टनुसार, हे ट्रेंड लॉकडाउननंतर प्रवास करण्याची इच्छा आणि स्थानिक पर्यटनात वाढ झाल्यामुळे आहेत.

तसेच, तिसर्‍या लाटेमुळे, देशातील पर्यटन उद्योगातील नवीन नोकर्‍यांमध्ये एक टक्क्याने घट झाली. हा अहवाल मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सच्या डेटावर आधारित आहे.

मॉन्स्टर डॉट कॉमचे सीईओ शेखर गरिसा यांनी सांगितले की, हिंदुस्थान प्रवास आणि पर्यटन उद्योगाने 2021 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने सुधारणा दर्शविली आहे.