स्वातंत्र्यदिनी धारावी जोडो यात्रा 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांना धारावीतच घर मिळावे. कोणालाही मुलुंड, देवनार कचराभूमीवर हाकलून लावून नका, या प्रमुख मागणीसाठी धारावीत शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता साहिल हॉटेल-अशोक सिल्क मिल कंपाऊंड येथून धारावी जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा धारावी बचाव आंदोलन या संघटनेतर्फे काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन असल्याने या यात्रेत निषेधाच्या घोषणा असणार नाहीत, अशी माहिती या संघटनेचे प्रमुख नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली.