जोशीमठ शहर 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटर खचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामधील जोशीमठ शहरात वेगाने होणारे भूस्खलन हा देशासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने नुकताच आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून जोशीमठमधील परिस्थितीचा आढावा घेत तेथील काही सॅटेलाईट फोटो जारी केले आहेत. अवघ्या 12 दिवसांत जोशीमठ 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे या सॅटेलाईट इमेजमधून दिसत आहेत. इस्रोच्या हैद्राबाद इथल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरकडून हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

इस्रोने जारी केलेल्या जोशीमठच्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाने जो भाग दाखवला आहे, तो जोशीमठ शहराचा आहे. यामध्ये आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिर दाखवण्यात आले आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते नोक्हेंबर 2022 या कालावधीत जोशीमठमध्ये 8.9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचे दिसून आले. मात्र, 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 या अकघ्या 12 दिकसांत या ठिकाणी  5.4 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. केगाने होणारे भूस्खलन हा चिंतेचा विषय ठरला आहे. चमोली जिल्हा प्रशासनाने जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांत येथील शेकडो घरे आणि इमारतींना भेगा पडल्या आहेत. जोशीमठमधील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात आहे.