‘सामना’चे ज्येष्ठ पत्रकार संतोष भोसले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दै. ‘सामना’च्या स्थापनेपासून गेवराई तालुका वार्ताहर असणारे संतोष भोसले (48) यांचे मंगळवारी दुपारी उपचार घेत असताना निधन झाले. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर रक्ताची तपासणी करण्यात आली तर तेव्हा त्यांना टायफाईड असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले होते. यातच दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 30 वर्षांपासून ते ‘सामना’चे गेवराईचे वार्ताहर म्हणून दै. ‘सामना’च्या संभाजीनगर आवृत्तीत काम पाहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.