के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या नव्या नावाला निवडणूक आयोगाची मंजुरी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतेच आपल्या ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ (टीआरएस) पक्षाचे नाव ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) असे केले होते. त्याला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी आज हैदराबाद येथील पक्षाच्या मुख्यालयावर भारत राष्ट्र समितीचा झेंडा फडकवला.