अफगाणिस्तानात सोन्याची खाण खचून 30 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। काबूल

अफगाणिस्तानमधील कोहिस्तान जिल्हयात सोन्याची खाण खचल्याने त्यात अडकून 30 जण ठार झाले असून 15 पेक्षा अधिक मजुर जखमी झाले आहेत. बडाखशान प्रांतात ही खाण आहे. रविवारी सकाळी  11 च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रवक्ता मोहम्मद नजारी यांनी दिली आहे. जखमींपैकी अनेकजणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या आकडयात वाढ होण्याची शक्यता आहे.