कल्याण, डोंबिवलीत आढळले कोरोनाचे आठ रुग्ण

563

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 8 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन जणांना रूग्‍णांना डिसेचार्ज देण्यात आलेला आहे. उर्वरित सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी 1 रूग्ण जसलोकमध्ये तर इतर सर्वजण कस्तुरबा रूग्णालयात उपचार घेत आहेत.

महापालिका क्षेत्रात शनिवारी 2 नवीन रूग्ण आढळून आले असून त्यांच्या 8 नातेवाईकांना कस्तुरबा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी, ३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरत 5 जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सध्या महापालिका क्षेत्रात 380 होम नागरिक क्वारंटाईन आहेत.

कोपर रोड, डोंबिवली पश्चिम येथील एका रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. सदर रूग्णास मुंबई येथील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीकरता बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, कल्याण येथील 0251-2310700 व शास्त्रीनगर सामान्य रूग्णा‍लय, डोंबिवली येथील 0251-2481073 व 0251-2495338 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या