मराठी तरुणीवर हल्ला प्रकरण, गोकुळ, रंजित झा यांना 14 दिवसांची कोठडी

कल्याणमधील एका खासगी दवाखान्यातील मराठी स्वागतिकेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी दोघांनाही कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

गोकुळ झा याच्याबर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखाल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना त्याचा ताबा आवश्यक होता. मात्र न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान रंजित झा याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने तो मान्य केला नाही.

आरोपीची दमबाजी

गोपाळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा यांना आज न्यायालयात घेऊन जात असताना आरोपी गोपाळ याने पत्रकारांना आपण लवकर भेटू, असे बोलून दमबाजी करून धमकी दिली होती. तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवालाही त्याच्यापासून धोका असल्याने पीडित तरुणीच्या संरक्षणासाठी शिवसैनिक सदैव तत्पर आहेत. आरोपी जेल बाहेर येतात त्याचे चांगलेच स्वागत करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांनी दिला आहे.