
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
मुलाला पालिका किंवा वाहतूक शाखेत नोकरीचे आमिष दाखवून महिलेला दोन लाख 40 हजारांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात किरण फुंदे या महिले विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत. मिलिंदनगर येथे राहणाऱ्या महिलेच्या मुलाला कल्याण-डोंबिवली महापालिकेत अथवा वाहतूक शाखेत कायमस्करूपी नोकरी लावून देते, असे आमिष दाखकून किरण हिने एक लाख 10 हजार रुपये उकळले, तर महिलेच्या भावाकडून एक लाख 30 हजार रुपये घेतले.



























































