
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोअर परळ येथील कमला मिल अग्नितांडवप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजोस बिस्त्रो रेस्टॉरण्टचा मालक युग तुली याला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
तुली याला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारांना फितविण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील निशांत काटेनश्वर यांनी केला. तो खंडपीठाने मान्य करून तुलीला जामीन देण्यास नकार दिला. मात्र अर्जदार तीन महिन्यांनंतर जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल करू शकतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
























































