कांदिवलीत सापडले अर्भक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली पूर्वच्या आकुर्ली मेट्रो स्थानकाजवळील इमारतीजवळ नवजात अर्भक आढळले आहे. या अर्भकावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी समतानगर पोलिसांना एक फोन आला. आकुर्ली मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीच्या लिफ्टच्या बाजूला अर्भक असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्या माहितीनंतर समतानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहिते हे घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.