आफ्रिदी स्वार्थी खेळाडू- इम्रान फरहातचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कराची

शाहीद आफ्रिदी हा पाकिस्तानी संघातील मोठा स्वार्थी खेळाडू आहे. त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पाकिस्तानच्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंच्या कारकीर्दीचे मातेरे केले आहे, असा घराचा आहेर पाकिस्तानी फलंदाज इम्रान फरहात याने आफ्रिदीला दिला आहे.

फरहात पुढे म्हणाला, मी आफ्रिदीच्या आत्मचरित्राबद्दल बरेच ऐकले आहे. गेली 20 वर्षे केवळ खोटे बोलून आपली पोळी शेकून घेणारा आफ्रिदी आता आत्मचरित्राच्या माध्यमातून देशविदेशातील मोठय़ा क्रिकेटरची बदनामी करीत आहे ही लज्जास्पद बाब आहे. आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात आफ्रिदीने ज्यांची बदनामी केलीय त्या सर्वांनी पुढे येऊन या झुठय़ा खेळाडूची पोलखोल करायला हवी असे मला वाटते असेही फरहातने म्हटले आहे.