करीना कपूर, अमृता अरोराला कोरोनाची लागण; दोन दिवसांपूर्वी करण जोहरच्या पार्टीत झाल्या होत्या सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते कमल हसन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनाही कोरोना झाल्याचे वृत्त आहे.

करीना कपूर दोन दिवसांपूर्वी बहीण करिश्मा कपूरसोबत करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती. कभी खुशी कभी गम फिल्मला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत रिया कपूरही पार्टीत सहभागी झाली होती. करीना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

करीना आणि अमृता यांची मैत्रई असून त्यांच्यात चांगली बाँडिंग आहे. नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या पार्टीत त्या सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांनी कोरोना निर्देशांचे उल्लंघन केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्या दोघी सुपरस्प्रेडर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघी अभिनेत्रींनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. एअनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

करीना आणि अमृता यांच्याआधी काजोलची बहीण तनीशा मुखर्जी यांनी सोशल मिडीयावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याआधी अभिनेते कमल हसन यांनाही त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मिडीयावर दिली होती. या दोन अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.