
करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. संजय कपूर हा 53 वर्षांचा होता. पोलो खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.
करिश्मा कपूरने 2003 साली संजय कपूरशी लग्न केले होते.त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. संजय व करिष्माने 11 वर्षांचा संसार केल्यानंतर 2014 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत लग्न केले.




























































