
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांच्या आत असणाऱया शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2 लाख रुपयांच्या वर कर्ज असणाऱया शेतकऱयांचाही वेगळा विचार केला जात असून त्यांची माहिती संकलित केली जात आहे. यथावकाश त्यांनाही न्याय दिला जाईल, अशी ग्वाही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
दुष्काळ, महापूर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात कर्जाचा वाढता बोजा यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतला. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. या शासन निर्णयातील तरतुदींकडे लक्ष वेधत विरोधकांनी सरकाला टीकेचे लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे येथे पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 2 लाख रुपयांच्यावर कर्ज असणाऱया शेतकऱयांनाही लवकरच न्याय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफीकरून आरोप करणाऱयांनी अटी घालून कर्जमाफी दिली होती. मात्र, आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला हेलपाटे मारू न देता कर्जमाफीची व्यवस्था करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
























































