सरकार चालवत नाही, कसेबसे सांभाळतोय! कर्नाटकातील मंत्र्याच्या वक्तव्यावरून खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील बसवराज बोम्मई सरकारमधील नाराजी उघड होऊ लागली आहे. ‘सरकार चालवत नाही, कसेबसे सांभाळतोय’ असे वक्तव्य कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याने केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावरून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्या वक्तव्यामुळे सरकारला काही धक्का लागू नये म्हणून मुख्यमंत्री बोम्मई यांनी डॅमेज पंट्रोलचा प्रयत्न चालवला आहे. मंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ दुसरा होता असे बोम्मई यांनी म्हटले आहे.

कर्नाटकात भाजपा सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच कायदा व संसदीय कार्यमंत्री मधुस्वामी यांची सामाजिक कार्यकर्त्यांशी फोनवर बोलतानाची क्लिप व्हायरल झाली. व्हीएसएसएन बँकेबाबत शेतकऱयांच्या समस्या मधुस्वामी यांनी त्या कार्यकर्त्याला सांगितल्या. आपण सरकार चालवत नसून सांभाळत आहोत आणि पुढील सात-आठ महिने ते सांभाळायचेय असे ते त्यावेळी म्हणाले. त्या वक्तव्याबद्दल सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी मधुस्वामी यांच्यावर टीका केली आहे, तर दुसरे मंत्री मुनिरत्ना यांनी मधुस्वामींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.