कर्नाटकावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय नाटय़ाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. परिणामी दोन्ही सभागृहांचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. तत्पूर्वी लोकसभेचे समस्तीपूरचे खासदार रामचंद्र पासवान आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच सभापती ओम् बिर्ला यांनी बिहारमधील समस्तीपूरचे लोकजनशक्ती पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू रामचंद्र पासवान यांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर सभागृहात रामचंद्र पासवान तसेच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले. वास्तविक संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या विद्यमान सदस्याचे किंवा विद्यमान मंत्र्याचे निधन झाले तर दिवंगत नेत्याच्या स्मरणार्थ कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा प्रघात आजवर होता. मोदी -2 मध्ये हा प्रघात मोडल्याचे आज दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या