बाप बाप होता है! भरपावसात अभ्यास करणाऱ्या मुलीसाठी वडिलांचे मायेचे छत्र

जगभरात रविवारी ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. वडील म्हणजे मुलांच्या आयुष्यातला पहिला सुपरहिरो. वडिलांचे छत्र हा मुलांसाठी खूप मोठा आधार असतो याचीच प्रचीती देणारा एक फोटो यानिमित्ताने व्हायरल झाला आहे. या फोटोत पाहायला मिळतंय की, बाहेर पाऊस सुरू असूनही एक मुलगी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून अभ्यास करतेय. मुलीच्या अभ्यासात कसलाही अडथळा येऊ नये आणि ती भिजू नये यासाठी वडील तिच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो कर्नाटकातील मलनाड परिसरातील सुलिया येथील आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना उंच ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो. ही मुलगीदेखील रोज सायंकाळी या रस्त्याच्या कडेला ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्यासाठी येते. दरम्यान, बापलेकीच्या नात्यातील गहिरेपण अधोरेखित करणारा हा फोटो सगळ्यांचे मन जिंवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या