
कार्तिकीवारी एकादशीचा मुख्य सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. पहाटेची श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. एसटी संपाचा वारीवर परिणाम झाला असला, तरी मिळेल त्या वाहनाने लाखो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली असून, रविवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने वारकऱयांची त्रेधातिरपीट उडाली.
तीन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षेसाठी व गर्दीवर नियंत्रण मिळवणे, वाहतूक काsंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून 3290 पोलीस अधिकारी व कर्मचारी राबत आहेत. आरोग्य विभागकडूनही भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
z कोरोना काळात मंदिरांसह एसटी बस सेवाही बंद होती. मंदिर सुरू झाल्यामुळे तब्बल 20 महिन्यानंतर भाविक पंढरीत कार्तिकी यात्रेला दाखल झाले आहेत. मात्र, एसटी बसच्या संपामुळे भाविकांची अडवणूक होत असून, भाविकांची संख्याही घटली आहे. 5 ते 6 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, तीन लाखांवर भाविक आले आहेत. मंदिर परिसरातील व शहरातील व्यापाऱयांनी नव्या जोमाने प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल व व्यावसाय सुरु केली आहेत.
































































