कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार छोटा पाहुणा, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

सारेगमप लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाची विजेती व प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिच्या घरात लवकरच एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. अगदी थाटामाटात हा सोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

कार्तिकी गायकवाड हिचे 2020 मध्ये रोनित पिसे या तरुणासोबत लग्न झाले. त्यांचे लग्न देखील अगदी शाही पद्दतीने पार पडले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आता आई होणार आहे. नुकताच कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला कार्तिकीने गडद हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात कार्तिक फारच सुंदर दिसत आहेत. तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.