भुयारी मार्गाचे 2022 मध्ये लोकार्पण, कशेडी घाटातील प्रवास होणार सुखकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या कशेडी भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे 2022 मध्ये या मार्गाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. दोन भुयारांपैकी एका भुयाराचे काम पूर्ण झाले असून दुसरे भुयारही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास कामाचा ठेका घेतलेल्या पंपनीने व्यक्त केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा चालकांसाठी कसोटीचा घाट मानला जातो. रायगड जिह्यातील पोलादपूर हद्दीत 11 किलोमीटर तर रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यात 7 किलोमीटर म्हणजे तब्बल 18 किलोमीटरचा असून हा घाट पार करण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. नागमोडी वळणांचा हा घाट चढताना आणि उतरताना चालकांकडून जरा जरी चूक झाली तरी जीवघेणा अपघात ठरलेलाच!

नागमोडी वळणे आणि पावसाळ्यात दरडी कोसळून उद्भवणारी परिस्थिती यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी खेड तालुक्यातील कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगावच्या दरम्यान बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड, मुंबई या पंपनीने या कामाचा ठेका घेतला असून 25 जानेवारी 2019 रोजी कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा बोगदा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ‘माईल स्टोन’ ठरणार आहे.

दुसराही बोगदा लवकरच

n खेड तालुक्यातील कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यानचा हा 3.44 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित बोगदा तयार करण्यासाठी 743.31 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सद्यस्थितीत एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱया मार्गाचेही काम लवकरच पूर्ण करून या भुयारी मार्गाचे 2022 मध्ये लोकार्पण करायचे असा मानस पंपनीचा आहे. तर मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी पेंद्रीय महामार्ग मंत्रालयाने कन्स्ट्रक्शन पंपन्यांजवळ 502 कोटी 45 लाखांचा करार केला आहे. यामध्ये तीन पदरी दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे.