
सामना प्रतिनिधी, मुंबई
जम्मू-कश्मीरची स्वायत्तता काढून टाकण्यावर तेथील जनतेमध्ये नाराजी आहे. ही स्वाततत्ता हिंदुस्थानमध्ये विलीन होताना त्यांना बहाल करण्यात आली असल्याचे वक्तव्य जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले.
अमेरिकन दूतावासामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कश्मीरमधील जनतेची महत्त्वाची समस्या ही ‘घाणेरडे राजकारण’ आहे. त्यामुळे राजकीय समझदारीशिवाय ही समस्या सुटणार नाही. जम्मू-कश्मीरची समस्या ही अन्य राज्यांपेक्षा वेगळी असून त्याला केंद्र सरकारला दोष देता येणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.
summary-kashmir residents are upset with autonomy removal































































