कश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले, तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज कश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसात आतापर्यंत श्रीनगरमध्ये पाच दहशतवादी हल्ले झाले आहेत.


या दहशतवादी हल्ल्यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात माखन लाल बिंद्रू, वीरेंद्र पासवान आणि मोहम्मद शफी यांचा समावेश आहे. माखन लाल बिंद्रू हे 70 वर्षाचे होते. बिंद्रू हे कश्मीरी पंडित असून त्यांचा औषध विक्रीचा व्यवसाय होता. 90 च्या दशकात दहशतवाद्यांनी कश्मीरी पंडितांना त्रास देण्यास सुरूवात केली आणि कश्मीरमधून अनेक कश्मीरी पंडितांनी पलायन केले होते. तेव्हाही बिंद्रू यांनी कश्मीर सोडले नव्हते. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यामागे कुठली दहशतवादी संघटना आहे हे अद्याप समजू शकले नाही. परंतु रेजिस्टेंस फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जवाबदारी घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. या संघटेत हिज्बुल मुजाहिदीन आणि लश्कर ए तैय्यबाचे अतिरेकी सामील आहेत. पोलीस याबात पुढील चौकशी करत आहेत.