
दहशतवादी हल्ल्याने जम्मू-कश्मीर हादरलेले आहे. 23 देशांचे राजदूत आणि राजनैतिक अधिकारी श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच्याजवळच असलेल्या प्रसिद्ध ढाब्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, कश्मीर खोऱयात हाय अलर्ट जारी केला आहे.
हाय सेक्युरिटी झोन असलेल्या दुर्गानाग भागात गोळीबार झाल्याने खळबळ माजली. युनोचे मिलिट्री ऑब्झर्वस ग्रुपचे कार्यालयाजवळ अवघ्या 200 मीटरवर गोळीबार झाला.




























































