
सामना ऑनलाईन । श्रिनगर
जम्मू कश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका कश्मिरी तरूणाने आपल्या प्राणांची बाजी लावून 7 पर्यटकांचे प्राण वाचवले. रऊफ दार (32) असे या बहाद्दूर तरूणाचे नाव असून तो टुरीस्ट गाईडचे काम करत होता. तेसेच तो पहेलगाममधील उत्कृष्ट राफ्टींग गाईड होता. 31 मे रोजी लिद्दर नदीत पर्यटकांना वाचवताना त्याला जीव गमवावा लागला आहे. रऊफने दाखवलेल्या बहाद्दुरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत असून त्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.
J&K:Rouf Ahmed Dar,a tourist guide lost his life while saving lives of 7 tourists after their boat capsized in Lidder river in Pahalgam on May31.His relative says,”He rescued the tourists,later he got stuck in a whirlpool in the river.He was the only earning member of his family” pic.twitter.com/mNV8T1sAU2
— ANI (@ANI) June 2, 2019
अनंतनाग लिद्दर नदीत 1 मे रोजी काही पर्यटक राफ्टींग करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोट उलटून सर्व 7 पर्यटक नदीत पडले. रऊफने या 7 जणांना कसेबसे वाचवले. त्यापैकी 2 पर्यटक हे पश्चिम बंगालचे आहेत. मात्र पर्यटकांना वाचवताना तो स्वत: पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा मृतदेह शनिवारी 1 जून रोजी भवानी पूलाजवळ आढळला.
रऊफ हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष होता. त्याचे वडीत कॅन्सरने पीडित असून वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रऊफने दाखवलेल्या हिंमतीचे अनंतनागचे पोलीस उपायुक्त खालीद जहांगीर, जम्मू कश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तसेच राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी रऊफच्या बहाद्दुरीचे कौतूक केले आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.































































