‘या’ अभिनेत्याशी जुळलं कतरिना कैफचं सूत?

4541

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या फारशी कुठे दिसत नाही. तिचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती फारशी कुठेही चर्चेत दिसली नव्हती. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये तिच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, त्याचं कारण तिचा आगामी चित्रपट नसून तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेली व्यक्ती आहे.

अभिनेता रणबीर कपूरसोबतचं नातं तुटल्यानंतर कतरिना सिंगलच होती. रणबीर आलिया भटसोबत नात्यात गुंतला असून त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र, कतरिनाच्या वैयक्तिक आयुष्यात कुणीही खास असावं असं जाणवत नव्हतं. पण आता कतरिनाचं एका अभिनेत्याशी सूत जुळल्याचा संशय अवघ्या बॉलिवूडला येत आहे. तो अभिनेता म्हणजे विकी कौशल.

vickey-kaushal-white

नुकतंच एका दिवाळी पार्टीत कतरिना आणि विकी सोबत दिसले होते. पार्टीहून बाहेर निघताना ते दोघंही एकत्र बाहेर पडले. छायाचित्रकारांनी त्यांचे फोटोही काढले. काही माध्यम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिना आणि विकी गेला बराच काळ एकमेकांना डेट करत आहेत. पण, त्यांच्यापैकी कुणीही हे मान्य केलेलं नाही. उलट असा प्रश्न आला की ते दोघंही शांत राहणं पसंत करतात. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे काहींनी या माहितीचं खंडन केलं असून ते दोघंही सिंगलच असल्याचं म्हटलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या