विकी कौशल नंतर कतरिना कैफलाही कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती…

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना बॉलीवूडलाही कोरोनाने विळखा घातला आहे. अशातच अभिनेत्री कतरिना कैफ हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्यावी’ असे तिने म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी कतरिना कैफचा कथित प्रियकर अभिनेता विकी कौशलनेही इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्टद्वारे करोना झाल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिलं होते की, संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होत.

आपली प्रतिक्रिया द्या