केदारनाथ धामचे कपाट उघडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत 90 हजारांहून अधिक भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ असा जयघोष भाविकांकडून केला जात आहे. पहिल्या दिवशी 38 हजार, दुसऱ्या दिवशी 25 हजार तर तिसऱ्या दिवशी 30 हजारांहून अधिक भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आहे.

























































