केजमध्ये शिवसैनिकांची तहसील कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, बळीराजा संकटात आहे, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या या मागणीसाठी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन करत केजच्या तहसील कार्यालयावर धडक मारली. शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण केज शहर दणाणून गेले.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला, संपूर्ण खरीप हंगाम परतीच्या पावसाने उद्धवस्त झाला, शेतकरी हाताश आणि चिंताग्रस्त झाला, मोठ्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेवीस हजाराची तातडीची मदत देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर शेकडो शिवसैनिक जाऊन धडकले.

ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला दिले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हासंघटक रत्नमाला मुंडे, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, जिल्हा सहसंघटक योगेश नवले, अनिल बडे, अरविंद थोरात यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.