
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युव्रेनच्या बाजूने भूमिका घेतलीय. त्यांनी आपल्या मेन्यूमधून ‘रशियन सॅलेड’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. केरळमधील या पॅफेची सोशल मीडियावर चर्चा होत असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोची येथील काशी आर्ट कॅफे अँड गॅलरी या कॅफेने यापुढे आम्ही रशियन सॅलेड हा खाद्यपदार्थ ठेवणार नाही, असं म्हटलंय. ‘युक्रेनच्या लोकांसोबत उभं राहण्यासाठी आम्ही मेन्यूमधून रशियन खाद्यपदार्थ काढून टाकलाय,’ अशा आशयाचा फलकच मालकाने कॅफेच्या समोर लावला आहे. कॅफे मालक एडगर पिंटो यांनी मानवतेच्या रक्षणासाठी ही भूमिका घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही, असेदेखील पिंटो यांनी स्पष्ट केले.

























































