
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सामाजिक घटना असो वा नैसर्गिक संकट मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार केरळवासीयांच्या मदतीला धावला आहे. अक्षय आणि चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनी नुकताच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठरावीक रकमेचा धनादेश केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिला.
प्रियदर्शन यांनी शनिवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मदतीचा धनादेश देतानाच फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. तसेच केरळवासियांच्या मदतीसाठी सगळ्यांनी एकजूट होऊन मदत करावी असे आवाहन त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केले आहे. ”मी आणि अक्षयने केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहे. चला एकजूट होऊन केरळला पुन्हा उभे करुया. यात कुठलही राजकारण नाही, धर्म नाही तर फक्त माणुसकी आहे” असे म्हटले आहे.
दरम्यान, अक्षय व्यतिरिक्त बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटीजनी केरळवासीयांना सढळ मदत करण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. यात सुपरस्टार अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, विद्या बालन, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. केरळवरील अस्मानी संकट पाहता अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या सत्यमेव जयते या चित्रपटाची पार्टी रद्द केली आहे. तर यूएईमधील मल्याळी बांधवांनी केरळवासीयांच्या मदतीसाठी समिती तयार केली आहे. तसेच यूएईच्या पंतप्रधानांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मल्याळीत केले आहे.
summary…kerala-floods-akshay-kumar-priyadarshan-donated
ഈ സംരംഭത്തിലേക്ക് ഉദാരമായി സംഭാവനചെയ്യാൻ ഏവരോടും ഞങ്ങൾ അഭ്യർഥിക്കുന്നു. യു എ ഇയുടെ വിജയത്തിന് കേരള ജനത എക്കാലവും ഉണ്ടായിരുന്നു. പ്രളയ ബാധിതരെ പിന്തുണക്കാനും സഹായിക്കാനും നമുക്ക് പ്രത്യേക ഉത്തരവാദിത്വമുണ്ട്. വിശേഷിച്ച് ഈദ് അൽ അദ്ഹയുടെ പരിശുദ്ധവും അനുഗ്രഹീതവുമായ ഈ സന്ദർഭത്തിൽ. pic.twitter.com/fixJX02bV4
— HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) August 17, 2018



























































