खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वीजपुरवठा खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले दोन दिवस दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळू लागला असल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट होऊ लागली आहे. सकाळी निरभ्र असलेल्या आकाशात दुपारनंतर अचानक काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पावसाळा सुरवात होत असल्याने कंपनीला आलेल्या पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे.

मी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच सुरु झालेल्या पावसाने यावर्षी कोकणाला चांगलेच झोडपून काढले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तर कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कोकणातील चिपळूण आणि खेड या दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या होत्या, ग्रामीण भागातही पावसाने हाहाकार उडवला होता. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी रस्ते, साकव वाहून गेले, मुसळधार पावसामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अतिवृष्टीतून वाचलेली पिकं आता कंपनीला आली असतानाच पुन्हा ढगांचा ढोल बडवत पावसाने जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने शेतातील उभ्या पिकांचे होत असलेले नुकसान पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागले आहे.

7 ऑक्टोबर पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने कोकणातील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे.