
अभिनेत्री कियारा आडवाणी ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कबीर नंतर शेरशाह असे दोन लागोपाठ सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेली कियारा ही अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चित्रपटांमध्ये कायम क्यूट बबली भूमिकेत दिसणारी कियारा प्रत्यक्षात मात्र बोल्ड आहे. गेल्या वर्षी कियाराचे डब्बू रत्नानीने केलेले टॉपलेस फोटोशूट चांगलेच गाजले होते.
View this post on Instagram
सध्या कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात कियाराने पेस्टल शेडच्या हिरव्या रंगाचे ब्लेझर घातले आहे. मात्र ब्लेझरच्या खाली पँट तिने घातलेली नाही. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून तिला ट्रोल केले आहे.
निर्माता करण जोहरने अलिकडेच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या यशाची पार्टी त्याच्याघरी आयोजित केली होती. कियारा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. त्या पार्टीला तिने पेस्टल शेडच्या हिरव्या रंगाचे ब्लेझर घातले होते. त्याखाली पँट नसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. कुणी मॅडम पँट कुठे आहे असे विचारले तर कुणी पँट घालायला विसरलीस का? असा सवाल केला आहे.
























































