
सोशल मीडियावर कलाकारांना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. कलाकार या ट्रोलर्सकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. मात्र अशाच ट्रोलिंगचा शिकार झालेल्या अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिने चाहत्यांना मजेशीर उत्तर दिले आहे. तिचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
‘कबीर सिंह (Kabir Singh)’ फेम कियाराने पिवळ्या रंगाच्या लांब ‘फेदरी ऑफ-शॉल्डर’ ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. एटिलीयर जुहरा (Atelier Zuhra) हिने हा ड्रेस डिझाईन केलेला आहे. पिवळ्या रंगाच्या या ड्रेसला शेवयांसारख्या दोऱ्या लटकताना दिसत आहेत. तिच्या या ‘मॅगी’सारख्या ड्रेसमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. अनेकांनी तिची तुलना मॅगीशी केली.
एका युझरने तिला चक्क ‘मसाला मॅगी’ असे संबोधले. तर दुसऱ्याने तुम्हाला जास्त मॅगी पसंद असते तेव्हा अशी अवस्था होते अशी कमेंट केली. एकाने तर तुम्ही मॅगी खावून थकला असाल तर हिचा गाऊन खावू शकता. जेवण वाया जावू न देण्याचा हा मजेशीर प्रकार आहे, अशी कमेंट केली. चाहत्यांच्या या मजेशीर कमेंटनंतर 27 वर्षीय कियाराने देखील ‘हाहा दोन मिनिटांमध्ये तयार’ ही मॅगीची टॅगलाईन कमेंट केली.

दरम्यान, कियारा आडवाणी लवकरच अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘गुड न्यूज’ या चित्रपटामध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात करीना कपूर आणि दिलजीत दोसांझचीही भूमिका असणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


























































