नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वेदांत कायंदेकरला कास्यपदक

341

तेलंगणा किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस् इनडोअर स्टेडियम, करीमनगर, तेलंगणा येथे नुकतेच राष्ट्रीय किक बॉक्सिंग कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल जिह्यातून  कु.  रुद्रायनी लोलगे, कु. दीक्षांत उबाळे आणि वेदांत कायंदेकर यांनी पॉइंट फाइट आणि म्युझिकल फॉर्ममध्ये सहभाग घेतला. शीवच्या  अवर लेडी हायस्कूलच्या  वेदांत कायंदेकरने म्युझिकल फॉर्ममध्ये कास्यपदकला गवसणी घातली. या सर्व खेळाडूंना  युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेचे मार्गदर्शक, अध्यक्ष व महाराष्ट्र वाको असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, संतोष खंदारे,  महेंद्र राजे, नितीन कदम आणि रोहित भोसले यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या