भयंकर!! वेदनेने कळवळणाऱ्या मुलाच्या गुप्तांगातून निघाल्या 11 सुया, डॉक्टरही हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण अनेकदा एखाद्याच्या पोटातून प्लास्टिक, नाणे किंवा केस निघाल्याची वृत्ते ऐकतो. पण, तुम्हाला हे शीर्षक वाचून नक्कीच भीतीने शहारा येऊ शकतो. कारण, अवघ्या तीन वर्षांच्या मुलाच्या गुप्तागांतून 11 सुया सापडल्या आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना तेलंगाणाच्या वानापर्थी जिल्ह्यातील वीपनगंडला येथे घडली आहे. येथील पी. अशोक आणि अन्नपूर्णा यांचा तीन वर्षांचा मुलगा गेले सहा महिने पोटदुखीने त्रासला होता. अनेक औषधं करूनही त्याला बरं वाटलं नव्हतं. काही काळाने त्रास वाढला आणि तो मुलगा सतत वेदनेने कळवळून रडू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा एक्स रे काढायचा निर्णय घेतला. एक्स- रे पाहिल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. कारण त्यात त्यांना या मुलाच्या शरीरात गुप्तांगाजवळ 11 सुया दिसत होत्या.

या सुया शिवणकामाच्या सुया होत्या. त्याची पाठ, गुदद्वार आणि गुप्तांग या अवयवांजवळ त्या दिसून येत होत्या. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करून त्यातील आठ सुया बाहेर काढल्या. अद्यापही त्याच्या शरीरात तीन सुया आहेत. मात्र, लवकरच त्याही बाहेर काढल्या जातील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सुया नेमक्या कशा प्रकारे त्याच्या शरीरात गेल्या, याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या मुलाच्या आईवडिलांना त्यांच्या नातेवाईकांवरच संशय असून त्यांच्या संशयानुसार पोलीस पुढील तपास करत आहे.