
संभाजीनगरच्या वाळुज एमआयडीसी क्षेत्रातील बजाज नगर एका इंग्लिश माध्यमिक शाळेच्या संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण करून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी अटक केली आहे. या खंडणीखोराच्या तावडीतून मुलाला सुखरूप सोडून घेतले आहे.
अपहरणाची ही घटना सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजाज नगरात सनराइज् इंग्लिश स्कूल आहे. या इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालकाच्या जवळपास आठ वर्षाच्या मुलाचे याच संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूने अपहरण केले होते कारण केल्यानंतर त्याच्या आईला फोन करून वीस लाखाची खंडणी मागितली होती. आपल्या मुलाचे अपहरण झाल्याने त्या महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले व त्या मुलाला सोडून घेतले. दरम्यान या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत सराफ पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कर्जबाजारीपणामुळे केले अपहरण
संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेला हा अपहरण कर्ता कर्जत बुडाला आहे. तो मुळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आपल्या वरील कर्ज फेडण्यासाठी त्याने संस्थाचालकांच्या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा
अपहरणकर्ता आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे.






























































