
लोकांना घरगुती लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी किसान कनेक्टने आगळावेगळा वृक्षारोपण उपक्रम राबवला आहे. एक आठवडाभर चालणाऱ्या व्हॅन महोत्सवाची (वन महोत्सव) सुरुवात 1 जुलैपासून करण्यात आली. या उपक्रमात मुंबई आणि पुण्यातल्या 7000 हून जास्त घरांना औषधी व ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वनस्पतींची रोपे त्यांच्या घरी मिळवून उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ते त्यांच्या बागांमध्ये, टेरेस गार्डनमध्ये किंवा इतर परिसरांमध्ये त्यांची लागवड करु शकतील.
किसानकनेक्ट या राज्यातल्या जलद गतीने प्रगती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मालकीच्या भाज्या व फळांच्या ऑनलाइन मार्केटप्लेसने हा पहिला आगळावेगळा व देशातील सर्वात मोठा उपक्रम सुरु केला आहे. त्यात मुंबई व पुण्यातील जवळपास 7000 हून जास्त कुटुंबांना त्यांच्या घरी रोपे मोफत दिली जाणार आहेत. किसानकनेक्टने जनतेला औषधी व ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांची त्यांच्या घरात लागवड करुन वृक्षारोपणात सक्रीय सहभाग घेण्याची व त्यांच्या घरच्या व आसपासच्या वातावरणाचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत, किसानकनेक्ट 7 जुलैपर्यंत मुंबई व पुण्याच्या लोकांना घरपोच 7000 रोपांचे वितरण करणार आहे. तुळस, कोरफड आणि मनी प्लॅंटसारख्या औषधी गुणविशेष असलेल्या आणि ऑक्सीजनचा पुरवठा करणा-या रोपांचे वितरण केले जाणार आहे. संस्थेने मुंबई व पुण्यातील पर्यावरणाप्रति सजग असलेल्या 7000 कुटुंबांची सर्वेक्षणामार्फत निवड केली आहे.आतापर्यंत दोन दिवसांमध्ये 3000 हून जास्त रोपांचे वितरण करण्यात आले आहे. लोकांना झाडे लावण्यासाठी व देशामध्ये अधिकाधिक वने तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उत्सव दरवर्षी जुलैमध्ये साजरा केला जातो.
लोकांनी चांगल्या पर्यावरणाच्या गरजेला समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. चांगले पर्यावरण ज्यामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या व औषधी वनस्पती या महाभयंकर आजारानंतर महत्वाची भूमिका पार पाडतात. व्हॅन महोत्सवाचे वेगळेपण दर्शवून देण्यासाठी आम्ही देशातल्या पहिल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये लोकांना कुठेही बाहेर नव्हे तर घरपोच रोपे मिळतील. आम्हाला लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीवरुन अधिकाधिक रोपे लावण्याचा निश्चय केला आहे, असे किसानकनेक्टचे ऍग्रोनॉमिस्ट विनोद गुंजाळ यांनी सांगितले. या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवणार असून अधिकाधिक मुलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत, असेही ते म्हणाले.
कोरोनामुळे आरोग्याप्रति जागरुक झाल्यामुळे लोक शेतावरच्या ताज्या, सुरक्षित, व स्वच्छ भाज्या व फळांना पसंती देऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाने त्यांची थेट शेतांमधून भाज्या व फळे खरेदी करण्याची इच्छा पूर्ण केली आहे, ते आता ऑनलाइन ऑर्डर करु शकतात. आरोग्याबद्दल जागरुक बनत असल्यामुळे आमची भेट म्हणून मिळालेले रोप त्यांना पर्यावरणाबद्दल देखील सजग बनवेल. किसानकनेक्टने आरोग्य व पर्यावरणाप्रति जागरुक पिढी घडवण्याचा निर्धार केला आहे, असे त्यांनी सांगितले.





























































