
कुकरमधील भात चिकट न होता मोकळा व फुललेला व्हावा, यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. शिजवण्यापूर्वी तांदूळ 2-3 वेळा धुवा आणि 15-20 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे भात एकसारखा शिजण्यास मदत होते.
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. साध्या भातासाठी दुप्पट पाणी घालावे? थोडे तेल किंवा अर्धा चमचा तूप घाला. यामुळे भात चिकटत नाही. लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने भात फुलतो.




























































