के.एल. राहुलची उपकर्णधारपदी निवड, रोहीत शर्मा जायबंदी झाल्याने निवड समितीचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटपटू के.एल. राहुल याची हिंदुस्थानी कसोटी क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. हिंदुस्थानी संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी राहुल याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहीत शर्मा हा जायबंदी झाल्याने तो या मालिकेमध्ये खेळू शकणार नाहीये. त्यामुळे या मालिकेसाठी त्याच्या जागी निवड समितीने राहुल याला उपकर्णधारपदी नेमण्याचं ठरवलं आहे. या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व हे विराट कोहलीच्या हाती असून राहुल हा त्याला सहाय्य करणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की रोहीत शर्मा संघात नसल्याने राहुल हा संघाचा उपकर्णधार असेल. रोहीत शर्मा हा दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकणार नाही असे बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले होते. त्याच्या जागी प्रियांक पांचाळ याला या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.