
कोकण रेल्वेवर आठ नवीन क्रॉसिंग स्थानके बांधण्याचे लक्ष्य असून जून 2021 पर्यंत यांचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या आठ नवीन स्थानकातील दोन स्थानके कर्नाटकातील असून उर्वरित स्थानके कोकणातील आहेत. या नवीन क्रॉसिंग स्थानकांमुळे दोन स्थानकांमधील अंतर कमी होणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
कोकण मार्गावर आठ नवीन क्रॉसिंग स्थानकांची भर पडणार असून या आठ स्थानकांचे काम अंतिम ठप्प्यात असून आठ लूप लाईन बांधण्याचे काम सुरू झाले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र जेथे बोगदे आहेत, तेथे मार्ग एकेरीच राहणार असून उर्वरित भागात दुपदरीकरण्याचे काम गेली सहा वर्षे सुरू आहे.
रोहा ते कीर या 46 कि.मी.च्या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यानच्या 203 किलोमीटर रेल्वेमार्गाकर नुकतीच विजेकर धावणाऱया इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रत्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी घेण्यात आली होती. यामुळे कोकणचा प्रवास वेगवान होणार आहे.
या आठ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात
वैभककाडी आणि नांदगाव दरम्यानच्या आचिर्णे या नव्या स्थानकाच्या शेवटच्या टप्प्यातील कामांसाठी येत्या शनिवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. ही आठ क्रॉसिंग स्थानके अंतिम टप्प्यात असून सापेकामणे, कलवणी, कडवई, केरकली, खारेपाटण, आचिर्णे ही कोकणातील असून मिर्झान आणि इन्नांजे ही दोन रेल्वे स्थानके कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






























































