कोल्हापूर – बाधितांचा आकडा 7 हजारांच्या उंबरठ्यावर, 24 तासात तब्बल 462 रूग्णांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे नसून जिल्ह्यात बाधितांची संख्या 7 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या तासांत जिल्ह्यात 462 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 6 हजार 905 झाली आहे. दिवसभरात 205 तर आतापर्यंत एकूण 3 हजार 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 तासात 14 जणांचा तर आतापर्यंत एकुण 199 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 639 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

गेल्या 24 तासांत कोल्हापूर शहरात सर्वाधिक 125 नवे रुग्ण आढळले आहेत. शिवाय गगनबावडा वगळता इंचलकरंजी सह इतर नगरपालिकेत 53, हातकणंगले-70, कागल-30, करवीर- 82 पन्हाळा-29, राधानगरी-22, शिरोळ-16, आजरा-9, भुदरगड-14, चंदगड-2 आणि गडहिंग्लज-4 अशी नवी रुग्ण संख्या आहे.