कोल्हापूर – कोरोना रूग्णांची संख्या 800 वर, शहरातील दोन ठिकाणं हॉटस्पॉट घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सायंकाळ पर्यंत आणखी तीन नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांची संख्या ८०० झाली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने, शहरातील न्यु कणेरकरनगर आणि इंचलकरंजी येथील कुडचे मळा हे दोन्ही ठिकाण जिल्हा प्रशासनाकडून हॉटस्पॉट ठरविण्यात आले आहेत.

कुडची मळा परिसरात रात्री आठ तर सकाळी दोन असे दहा नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे येथे एकुण रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली आहे. येथे कर्नाटकातील बोरगावहुन येऊन एका ठिकाणी काम करणारे पती,पत्नी दोघे पॉझिटिव्ह आढळले. तर काल रात्री उशिरा रंकाळा तलाव परिसरात रंकाळा टॉवर परिसरात एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, हा परिसर सील करण्यात आला आहे.सायंकाळी व्यक्तीच्या पत्नीचा ही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शिवाय चंदगड तालुक्यातील अडकुरपैकी मोरेवाडी येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आईलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.आतापर्यंत ‌एकुण १० कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला असुन, सध्या ७७ कोरोना बाधीत रुग्णांवर सीपीआर मध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

आज सकाळी १० वाजेपर्यंत २७३ प्राप्त अहवालापैकी २४९ निगेटिव्ह तर १६ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. यापूर्वी पाठविण्यात आलेले २ पॉझीटिव्ह तर १ पुन्हा पॉझिटिव्ह आणि ५ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझीटिव्हपैकी ७१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.