कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक, बाधितांचा आकडा 2 हजार पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्तीच्या दिशेने असलेल्या जिल्ह्यात दोन आठवड्या-पासुन कोरोनाचा उद्रेक होऊन लागला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी हजारांमध्ये गेलेली संख्या आज दोन हजारांच्या घरात गेली आहे. प्रत्येक दिवशी आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या आता १०-२० वरुन थेट २०० हुन अधिक झाली आहे.शुक्रवारी रात्री ९ ते आज सायंकाळी ७ पर्यंत तब्बल २३२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण बाधीतांची संख्या २ हजार ९२ वर पोहोचली, तर आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या ४४ झाली. सध्या १ हजार ५५ पेक्षा अधिक कोरोना बाधीतांवर सीपीआरसह विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणे कडुन मिळाली.

दुपारी तीनच्या अहवालानुसार जिल्ह्यात इंचलकरंजी येथे ३५७ अशी सर्वाधिक रुग्णांची संख्या झाली आहे. पाठोपाठ कोल्हापूर शहर- २३३, शाहुवाडी-२१५, चंदगड-२१३, करवीर-२०४ आणि गडहिंग्लज तालुक्यात १४६ अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे. गगनबावडा तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी ७ रुग्ण आढळले आहेत. शिवाय शिरोळ-४०, हातकणंगले-५४, कागल-६४, पन्हाळा-८२, भुदरगड-८३, राधानगरी-८४ आणि आजरा तालुक्यात ९७ रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत इंचलकरंजीत सर्वाधिक १९ बाधीत रुग्ण दगावले आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र आणि गडहिंग्लज तालुका असे प्रत्येकी ५, हातकणंगले- ४,आजरा व करवीर प्रत्येकी २ आणि भुदरगड, चंदगड, पन्हाळा, शाहुवाडी व शिरोळ तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण दगावला आहे. राधानगरी, कागल आणि गगनबावडा तालुक्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण दगावलेला नाही.