
कोल्हापुरात स्वतःच्या फार्महाऊसमध्ये राजकुमार राजहंस या वकिलाने थाटलेली ड्रग्जची फॅक्टरी मुंबई अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी)उद्ध्वस्त केली. शेळी व कुक्कुटपालनाच्या नावाखाली वकील एमडी ड्रग्ज बनवत होता. गंभीर म्हणजे ड्रग्जची डिलिव्हरीदेखील तो स्वतः करायचा. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य तसेच एमडीचा साठा अशाप्रकारे दोन कोटी 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांना अटक केली.
चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे राजकुमार राजहंस या वकिलाचा फार्महाऊस आहे. त्या फार्महाऊसमध्ये राजहंस याने शेळी व कुक्कुटपालनासाठी शेड उभारली असून, त्या शेडमध्ये छुप्या पद्धतीने एमडीची फॅक्टरी सुरू असल्याची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता सुतार, संजय चव्हाण, दहिफळे, एपीआय वाहिद पठाण आदींच्या पथकाने राजहंस याच्या फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथे बांधलेल्या एका शेडमध्ये एमडी बनविण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. त्याठिकाणी पोलिसांना 12 लाखांचा एमडी, 19 लाख 35 हजार किमतीचा एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, 25 लाखांची मशिनरी असा तब्बल दोन कोटी 35 लाख 50 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. त्याठिकाणी केअर टेकरचे काम करणारा निखिल लोहार (29) या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
महिला तस्कर सापडल्यानंतर…
वांद्रे युनिटने गेल्या आठवडय़ात क्रिस्टिना मॅकलिन (35) या महिलेला एमडी ड्रग्जसह रंगेहाथ पकडले होते. तिच्याकडे तेव्हा पाच लाखांचा एमडी सापडला होता. हा एमडी तिने राजकुमार राजहंस याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, राजहंस हा वकील असून, त्याने कोल्हापुरातील फार्महाऊसवर एमडीची फॅक्टरी खोलल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी क्रिस्टिनाला पकडून कोल्हापुरात कारवाई केली.
वकिलीबरोबर ड्रग्जचा धंदा
राजहंस हा पेशाने वकील आहे. अंधेरीत त्याचे कार्यालय आहे. पण असे असताना त्याने कोल्हापुरातील फार्महाऊसवर एमडीची फॅक्टरी सुरू केली होती. दोन तीन वर्षांपासून त्याचा हा कारोबार सुरू होता. राजहंस स्वतः त्याच्या इनोव्हा कारने 15 दिवसातून कोल्हापूरला जातो. तयार झालेला एमडीचा साठा घेऊन मुंबईत आणतो आणि त्याचे वाटप करतो, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. याप्रकरणात आणखी अटकेची कारवाई होईल, असेही नलावडे म्हणाल

























































