कोल्हापूरात ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.अनेक ठिकाणी सोशल मिडियाच्या माध्यमातुन सरनामा वाचनासह घटनेचे महत्व विशद करणा-या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.

संविधान दिनानिमित्त आज ऐतिहासिक बिंदू चौक येथे सोशल डिस्टन्सिंग पाळुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.विविध पक्ष, संघटनांसह महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.  यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,उप आयुक्त निखील मोरे,सहा.आयुक्त विनयक औंधकर,संदीप घार्गे,आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ,मुख्य लेखापाल संजय सरनाईक ,मुख्य अग्निशम अधिकारी रणजित चिले, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण,कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड,जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या