कोल्हापुरात दोन सराफांची 64 लाखांची फसवणूक

दोन सराफ व्यावसायिकांकडून तयार केलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी घेऊन 64 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हुपरीतील कारारिगराविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत उर्फ अमित तवनाप्पा कांते (37 रा.हुपरी, ता.हातकणंगले) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, दत्तात्रय दिनकर म्हसवेकर (43, रा. लक्षतीर्थ वसाहत) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

लक्षतीर्थ वसाहतीत दत्तात्रय म्हसवेकर व त्यांचे मित्र सुभाष शिंदे यांचा सराफ व्यवसाय आहे. हुपरी येथील ओळखीचे कारागीर श्रीकांत कांते याने म्हसवेकर यांच्याकडून 1 किलो वजनाचे सोन्याचे, तर सुभाष शिंदे यांच्याकडून सुमारे 36 किलो चांदीचे दागिने असा एकूण 64 लाख रुपये किंमतीचा ऐवज विक्रीसाठी नेला होता. त्याने या दागिन्यांचे पैसे तसेच दागिनेही म्हसवेकर व शिंदे यांना परत दिले नाहीत. त्यामुळे म्हसवेकर यांनी कांतेविरोधात गुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांत फसवणूकीचा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या